आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निसर्ग चक्रीवादळ :पंचनाम्यासाठी नुकसानीचे फोटो, व्हिडिओ ग्राह्य धरावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटी

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रागगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी जिल्ह्याला १०० कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. आपण पॅकेज जाहीर करणार नसून तातडीने राज्य सरकारकडून १०० कोटी देत आहोत, असे ते म्हणाले. इतर जिल्ह्यांनाही तेथील नुकसानीनुसार शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘पंचनामे पूर्ण होण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र, लोकांनी नुकसानीचे फोटो-व्हिडिओ काढून ठेवावेत. ते पंचनाम्याच्या कार्यवाहीत ग्राह्य धरण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या दौऱ्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे (५८) यांचा विजेचा खांब अंगावर पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.

नुकसानीच्या आढाव्यानंतर केंद्राकडे मदत मागणार

उगाच वारेमाप घोषणा करण्यात अर्थ नाही. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. पंचनाम्यास सुरुवात केली आहे. ते पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर अंतिम मदत जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. सर्व नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राकडे मदत मागू, पंतप्रधान मोदींनी मदतीचे आश्वासन दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नुकसानभरपाई संदर्भात पवार-ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई |मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. निसर्ग चक्रीवादळाचा १४ जिल्ह्यांना फटका बसला आहे. त्याच्या नुकसानभरपाईबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप मदतीच्या काही ठोस घोषणा केलेल्या नाहीत. त्यामुळे पवार यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. एक-दाेन दिवसांत भरपाईची घोषणा केली जाऊ शकते.

पंचनाम्याआधीच तातडीची मदत रोखीने द्या : फडणवीस

मुंबई | निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आज तातडीची मदत आवश्यक असल्याने पंचनामे पूर्ण होईस्तोवर तातडीची रोखीने मदत द्या, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, वीज व दूरध्वनी सेवा खंडित आहेत. अशा स्थितीत पंचनामेे त्वरेने करावेच लागतील. पण, तोवर तातडीने आणि रोखीने मदत करण्याची नितांत गरज आहे.

0