आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचा रुद्रावतार:फोटोंमध्ये पहा - 120 किमी प्रतितास वेगाने महाराष्ट्रात आलेल्या चक्रीवादळाने कशाप्रकारे नुकसान केले

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्ग चक्रीवादळात ठाणे जिल्ह्यात एका घरावर झाड कोसळले, त्यानंतर पालिकेचे काही कर्मचारी ते काढण्यासाठी गुरुवारी दाखल झाले. - Divya Marathi
निसर्ग चक्रीवादळात ठाणे जिल्ह्यात एका घरावर झाड कोसळले, त्यानंतर पालिकेचे काही कर्मचारी ते काढण्यासाठी गुरुवारी दाखल झाले.
  • चक्रीवादळ निसर्गाने बुधवारी अलिबागजवळ धडक दिली होती,
  • वादळामुळे मुंबईत आजही मुसळधार पाऊस पडत आहे

अरबी समुद्रात उठलेले 'निसर्ग' चक्रीवादळ मुंबईजवळी अलिबागला धडकले. परंतु वादळाने मुंबईला फारसे प्रभावित केले नाही. आता वादळ राज्यातील पश्चिम विदर्भात दबाव क्षेत्रात बदलले आणि नंतर ते कमकुवत पडेल. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ही माहिती दिली. 

चक्रीवादळ 'निसर्ग'ने बुधवारी मुंबईपासून सुमारे 110 किलोमीटर दूर अलिबागमध्ये धडक दिली. मात्र याचा मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही. हवामान विभागाने ट्वीट केले की, खोल दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरकत चार जून रोजी भारतीय वेळेनुसार साडेपाच वाजता पश्चिम विदर्भात दबावाच्या क्षेत्रात बदलले. आज संध्याकाळपर्यंत ते कमी दाबाच्या क्षेत्राच्या रुपात कमकुवत पडले.

निसर्ग वादळात पॉलिथीनमध्ये स्वतःचा बचाव करताना एक मुलगी

120 किलोमीटरच्या वेगाने आलेल्या वादळाने केला कहर 

महाराष्ट्रातील किनारपट्टीलगच्या जिल्ह्यात बुधवारी दुपारी 120 किमी प्रतितास वेगाने पोहोचल्यानंतर सायंकाळी चक्रीवादळ कमकुवत झाले. रायगड, पालघर आणि पुणे या किनारपट्टी जवळच्या जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला. येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आणि समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या. किनारपट्टी भागातील काही ठिकाणी सहा ते आठ फूट लाटा उसळल्या. काही ठिकाणी निवासी अपार्टमेंटच्या छतावरील टीनचे छप्पर उडून केले तर अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. 

रायगड जिल्ह्यात वादळापासून वाचण्यासाठी घरी जाणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीवर विजेचे ट्रान्सफॉर्मर पडून त्याचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये घर पडल्याने 65 वर्षीय महिला 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

'निसर्गा'चा धोका पाहता वांद्रे-वरळी सी लिंक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता.

मुंबईत निसर्गाच्या धोक्यात अनेकजण मजा करताना दिसले. मुंबईत मरीन ड्राईव्हवर फोटोशूट करताना एक मुलगी.

निसर्गाचा धोका लक्षात घेता मुंबईतील धारावीसह अनेक झोपडपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

निसर्ग वादळा दरम्यान मुंबईत दोन तरुण एका वृद्धाला स्कूटीवर रुग्णालयात नेताना. सध्या मुंबईत कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे.

निसर्गाच्या इशाऱ्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर दिवसभर शांतता होती.

पालघर जिल्ह्यात वादळाने मोठी हानी केली, येथे एका घराचे छप्पर उडाले आणि एक जण जखमी झाला आहे.

पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड भागात निसर्गाने मोठे नुकसान केले. जोरदार वाऱ्यामुळे येथे एक घर कोसळले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका घरावर नारळाचे झाडे कोसळले. योग्य वेळी बाहेर आल्याने कोणालाही इजा झाली नाही.

मुंबई व पुण्यात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने शेकडो वाहनांचे नुकसान झाले आहे.

निसर्ग वादळादरम्यान रायगडमध्ये अरबी समुद्रात एक जहाज अडकले होते.

वादळाच्या वेळी मुंबई पोलिसांनी शहरांच्या सीमा केल्या होत्या.

निसर्गाचे आगमन होण्यापूर्वीच हजारो लोकांना मुंबईतील बीएमसी रुग्णालयात हलविण्यात आले.

निसर्गाचा धोका पाहता रुग्णालयाबाहेरील काही लोकांना एका संस्थेशी संबंधित लोकांनी सुरक्षित ठिकाणी पोहचवले.

निसर्गाच्या आगमनानंतर मुंबईच्या समुद्रात दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा दिसल्या.

वादळाच्या आगमनापूर्वी मुंबईतील बऱ्याच लोकांना बीएमसी शाळांमध्ये हलविण्यात आले होते. यावेळी मुलासोबत खेळताना एक मुलगी.

पुण्यात निसर्ग चक्रीवादळामुळे 400 हून अधिक झाडे कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

वादळापासून वाचण्यासाठी मुंबईत काही लोकांनी झाडाखाली आसरा घेतला होता. येथे वादळात मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या 8 पथके तैनात केली होती.

मुंबईच्या किनारपट्टी आणि पालघरच्या अनेक भागांतून लोकांना सुरक्षित केंद्रात हलविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...