आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंतोष परब हल्लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती खालावली आहे. रात्री उशिरा त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नितेश राणेंची तब्येत बिघल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आहे. मात्र नितेश राणे पोलिस कोठडीत असल्याने त्यांना भेटण्याची कुणालाही परवानगी नाही. त्यामुळे आता नारायण राणे यांना पोलिस भेटू देणार का हे पाहावे लागेल. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नसल्याची माहिती मिळत आहे.
नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहात न ठेवता रुग्णालयात ठेवण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात केली होती. कणकवली दिवाणी न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे यासंबंधीचा अर्ज दिला होता. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. याबाबत त्यांनी न्यायालयाला कळविले असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नितेश राणे यांना कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. रात्री उशिरा त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्लाप्रकरणी कणकवली न्यायालयाने सुरुवातील नितेश राणे यांनी चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी पुन्हा यावर सुनावणी करण्यात आली असून, त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर धडधाकड असणारे आमदार नितेश राणे यांची तब्येत काहीच क्षणात कशी काय बिघडते?, असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला होता.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टर देखील ते आजारी असल्याचे सर्टिफिकेट देतात. असे होत असेल तर लोकांमधील भीती कमी होऊन, कोणीही कायदा हातात घेऊ शकतो. यापूर्वी आपण गृहमंत्री असताना त्यांनी असाच बनाव केला होता. त्यावेळी त्याची मी पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना कोठडीत पाठवले होते. परंतु यावेळी असे काहीच झाले नाही. असेच होत राहिले तर लोकांच्या मनातील भीती कमी होऊ शकते. त्याची खरीच तब्ब्येत बिघडली आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नाही, असे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
रात्री तब्येत बिघडली
कणकवली सत्र न्यायालयाने शुक्रवारी नितेश राणे यांच्या पोलिस कोठडीत 18 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. नितेश राणे यांच्या वकिलांची तब्येत बिघडल्यानंतर नितेश राणे यांना देखील रुग्णालयातच ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. ही मान्य झाल्यानंतर नितेश राणे यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र रात्री त्यांची तब्येत बिघडली आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.