आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सामना' सुरू:चोमडेगिरीत संजय राऊतची PHD, सुप्रिया सुळे-अजितदादांमध्ये आग लावली; नीतेश राणेंची विखारी टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजचा सामनातला अग्रलेख पाहून कळते चोमडेगिरीत संजय राऊतची पीएचडी झाली आहे. अजितदादांना संजय राऊतांचा रंग माहित आहे. त्यामुळे त्यांनी आधीच त्यांना खडसावले होते. त्यांची इज्जत काढली होती. सुप्रिया सुळे-अजितदादांमध्ये आग लावण्याचे काम राऊत करत आहेत, असा हल्लाबोल भाजप नेते नीतेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत असताना यावरून मोठ्या प्रमाणात टीकेचे राजकारण सुरू आहे. आता नीतेश राणेंनी संजय राऊतांवर पवारांच्या घरात आग लावल्याचा आरोप केला आहे.

तु तेव्हा कुठे होतास?

नीतेश राणे म्हणाले, बाळासाहेबांचे बेळगावाविषयी आंदोलन सुरू होते, तेव्हा संजय राऊत कुठे होते? त्यावेळचे लोकप्रभाचे आर्टिकल वाचल्यावर त्यांची भूमिका कळते. सरडा रंग बदलतो तसे ते रंग बदलतात. संजय राऊत आधी समाजवादी विचारांचे होते. हिंदूविरोधी लेख त्यांनी लिहिले. त्यावर त्यांचे नाव आहे. आता हिंदुत्वाच्या बाता करतात. तसेच भाजपचा बेळगावाशी काय संबंध हे विचारण्याआधी तुम्ही तेव्हा कुठे होतात? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

पत्राचाळविषयी बोल

नीतेश राणे म्हणाले, पत्राचाळेतील सामान्य लोकांचे काय केले. तुमच्या मालकाच्या मुलांसारखे 97 हजार बिल ते नाही करत. याविषयी बेळगावमध्ये जाऊन बोला. तुम्हाला बेळगावमध्ये जाण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.

जसा कामगार तसा मालक

नीतेश राणे म्हणाले, यांचा एक डोळा तेजस-आदित्यवर दुसरा पवार कुटुंबीयांवर आहे. संजय राऊतांनी ळगावला जाण्याआधी आमच्या उमेदवाराला विरोधात प्रचार न करण्यासाठी पैशांची मागणी केली. षण्मुखानंदमध्ये राणे साहेब शेवटच्या भाषणात म्हणाले होते उद्धव ठाकरे तिकीट देण्यासाठी पैशांची मागणी करत आहे. त्यामुळे जसा कामगार तसाच मालक असल्याची टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादीत असंतोष:पवार कुटुंबात एक नाते, पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही; संजय राऊतांचे अजितदादांविषयी सूचक विधान

अजित पवारांविषयीच्या निर्माण केलेल्या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. पवार कुटुंबात एक नाते आहे. पण राजकारण वेगळे असते. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. आज राष्ट्रवादीत आम्ही असंतोष पाहतोय, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज हे वक्तव्य केले आहे. राऊतांनी अजित पवारांबाबत केलेल्या या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. वाचा सविस्तर