आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेब ठाकरेंनी 1992 मध्ये राजीनामा का दिला होता याबाबत भाजप नेते नीतेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत, सुभाष देसाई यांनी ठाकरेंच्या घरात भावाभावात भांडणे लावली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या घरात या लोकांनी आग लावली. आणि याचमुळे बाळासाहेबांनी 1992 मध्ये राजीनाम्याचा निर्णय घेतला होता, असे नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल अचानक आपण निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहिर केला. आणि एरव्ही भक्कम वाटणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. यावेळी शिवसैनिकांना 45 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कशी परिस्थिती ओढवली होती. त्या घटनेची आठवण झाली. भाजप नेते नीतेश राणे यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरेंच्या राजीनाम्यामागे कोण होते याबाबत आरोप केले आहेत.
अन् बाळासाहेबांनी बदलला निर्णय
नीतेश राणें म्हणाले, अंतर्गत घाणेरड्या राजकारणाला कंटाळून बाळासाहेबांनी राजकारणाला जय महाराष्ट्र केला होता. असे ट्विट संजय राऊत यांनी केले. मात्र बाळासाहेबांनी असे का केले होते याबाबत राऊतांनी सांगायला हवे. ते म्हणजे संजय राऊत, सुभाष देसाई यांनी केलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे. ठाकरेंच्या घरात भावाभावात भांडणे लावली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्य़ा घरात या लोकांनी आग लावली. त्यावेळी बाळासाहेब कर्जतच्या फार्महाऊसवर निघून गेले. त्यावेळी राणे साहेब आणि अन्य शिवसैनिकांनी कर्जतला जाऊन बाळासाहेबांना विनंती केली. आणि बाळासाहेबांनी निर्णय बदलला.
राऊतांनी आग लावली
नीतेश राणें म्हणाले, यातून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे संजय राऊत घरात घेण्याच्या लायकीचा माणूस नाही. घरात घेतल्यानंतर त्या घराचे वातावरण खराब करणे, भांडणे लावणे एवढेच संजय राऊतचे काम आहे. आणि तीच गोष्ट आता त्याने पवार साहेबांच्या घरात केली. पवार कुटुंबीयांच्या वैयक्तिक बाबींवर एकमेव संजय राऊत बोलत होता. महाराष्ट्रातील राजकारणातील कुठलाही राजकारणी यावर बोलत नसताना संजय राऊत अजित पवारांवर टीका करत होते. तु आग लावायला आणि तोंड काळ करायला का जातोस सर्व घरांमध्ये? असा सवाल राणे यांनी विचारला.
मविआच्या सभेतही अपमान
नीतेश राणे म्हणाले, बीकेसीच्या सभेत अजित पवारांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. स्टेजवर अजितदादा आल्यावर सर्वांना भेटले त्यावेळी राऊत निट भेटले नाही. नंतर भाषणात गोडवे गायले. शकुनी मामा बरा. मुंबईतील सभेत अजित पवारांना मुख्य पोडियम दिले नाही. अजित पवारांना अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संबंधित वृत्त
पुनरावृत्ती:शरद पवारांमुळे शिवसैनिकांना आठवला बाळासाहेब ठाकरेंचा राजीनामा, कार्यकर्त्यांमुळे घ्यावा लागला होता निर्णय मागे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल अचानक आपण निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहिर केला. आणि एरव्ही भक्कम वाटणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. यावेळी शिवसैनिकांना 45 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कशी परिस्थिती ओढवली होती. त्या घटनेची आठवण झाली. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.