आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरेंनी आपला आत्मा, धर्म विकून हिंदुत्वाशी बेईमानी केली. आता नितीमत्तेची भाषा बोलत आहेत. तुम्ही नैतिकता कोणाला शिकवता? असा सवाल भाजप नेते नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधक आपापली बाजू मांडत आहेत. आमच्याच बाजूने निर्णय कसा याविषयी सगळे नेते सध्या स्पष्टीकरण देत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी न सोडणारे संजय राऊत आणि नीतेश राणे यांनी देखील यानिमित्ताने टीकेची झोड उठवली आहे. राऊतांनंतर नीतेश राणेंनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
स्वतःचा सुंता करून टाकला
नीतेश राणे यावेळी बोलताना म्हणाले, काल नितीश कुमारसोबत लालुप्रसाद यादवचा मुलगा मातोश्रीत आला होता. याच लालुप्रसाद यादवने संधी मिळेल बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केलेला आहे. आणि उद्धव ठाकरे त्यांचेच स्वागत करत आहेत. तुम्ही हिंदु नाही. तुम्ही स्वतःचा सुंथा करुन टाकला आहे.
बाळासाहेबांच्या खोलीत का नेले नाही?
नीतेश राणे पुढे म्हणाले, तुम्ही खरच हिंदु असता तर नितीश कुमार, आणि लालुप्रसाद यादवच्या मुलाला बाळासाहेबांच्या खोलीत नेऊन नमस्कार करायला सांगायला हवा होता. दाखवा ते फोटो नमस्कार करतानाचे, लालुप्रसाद यादवने राम मंदिराच्या रथाला अडवले, यावर त्यावेळी सामनात विरोधी अग्रलेख देखील लिहिले.
पत्रकार आहेस की दलाल?
नीतेश राणे म्हणाले, राऊतांमध्ये नैतिकता असेल तर खासदारकीचा राजीनामा दे. हिंमत आहे का, पुन्हा निवडून यायची. मविआचे नेते यांना शिव्या घालताय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुला कळलेला नाही, फडणवीसांची डिग्री विचारणारा तु पत्रकार आहेस का हे तपासायला हवे, पत्रकारांकडे एवढी संपत्ती असते का? पत्रकार आहेस की दलाल ते अगोदर स्प्ष्ट कर, असा टोला यावेळी राणेंनी लगावला.
संबंधित वृत्त
सरकारचा अंत जवळ:बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नयेत, राऊतांचे आवाहन; फडणवीसांनी निकालाचे चुकीचे विश्लेषण केल्याचा दावा
बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत. या 16 आमदारांना घरी जावे लागणारच. न्यायालयाने यांना उघडे पाडले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढवला. तसेच दाबादाबी चालणार नाही, 90 दिवसांत निर्णय घ्यावाच लागेल, अन्यथा पाहा काय होईल, असा इशारा दिला. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.