आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:उद्धव ठाकरे अस्वस्थ, संजय राऊतमुळे यांच्या घरातील लफडी बाहेर येताहेत; सकाळच्या कामगाराचे तोंड बंद करा-नीतेश राणे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काल उद्धव ठाकरे अस्वस्थ दिसत होते. कारण संजय राऊतमुळे यांच्या घरातील लफडी बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात शांतता हवी असेल तर संजय राऊतचे तोंड बंद करा. खोटेनाटे आरोप करायचे नाही. मुद्द्यावर बोला. जर माझ्या अजून पत्रकार परिषदा झाल्या तर तुमचे महाराष्ट्रात फिरणे बंद होईल, असा इशारा भाजप नेते नीतेश राणे यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीची काल बीकेसी मैदानावर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंपासून नाना पटोलेंपर्यंत सर्व नेत्यांनी भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. संजय राऊत यांनी आज सकाळी देखील सभेवरुन भाजपला डिवचले. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेचच भाजप नेते नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर हल्ला चढवला.

हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व का?

नीतेश राणे म्हणाले, महाविकास आघाडी यानंतर मंगलकार्यात सभा घेईल. कालची गर्दी ही 80 टक्के अल्पसंख्यांक समाजाची होती. तो मूळ मतदार संघ झिशान सिद्धीकीचा आहे. जितेंद्र आव्हाड मध्येमध्ये हिंदीत बोलत होते. माझ्याकडे आलेली माहिती अशी कि या सभेला आलेल्या मुस्लिम लोकांना टोप्या काढून ठेवा असे सांगण्यात आले होते. हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व का? बाळासाहेबांना कालची सभा पाहिल्यावर दुःख झाले असेल.

सकाळचा भोंगा बंद करा

नीतेश राणे म्हणाले, अजितदादांना सगळे माफ आहे. अजितदादा करमुक्त आहे. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. उद्धव ठाकरेंना बोलल्यावर त्यांना झोंबते. मात्र तुमचा सकाळचा भोंगा, कर्मचारी रोज सकाळी येऊन आमच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांवर वैयक्तिक टीका करत आहे. तुमचा कामगार जर रोज सकाळी येऊन आमच्या नेत्यांवर बोलणे बंद करणार असेल तर मी देखील किती माहिती बाहेर काढायची याचा विचार करेल.

महाराष्ट्रात फिरणे बंद होईल

नीतेश राणे म्हणाले, तुम्ही आमच्यावर काहीही बोलणार तर आम्ही गप्प बसणार नाही. तुमच्या शकुनी मामाला सांगा सकाळचे 10 वाजताचे थोबाड बंद कर. खोटेनाटे आरोप करायचे नाही. मुद्द्यावर बोल. माझ्या आत्तापर्यंत 5 पत्रकार परिषदा झाल्या आहेत. जर माझ्या अजून पत्रकार परिषदा झाल्या तर तुमचे महाराष्ट्रात फिरणे बंद होईल.

उद्धव ठाकरे पुस्तक लिहा

नीतेश राणे म्हणाले, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी उद्धव ठाकरेंनी एक चरित्र लिहावे. कुठलाही धंदा न करता श्रीमंत कसे व्हावे. कुठलाही उद्योग न करता एवढी संपत्ती कशी मिळवली, आलिशान गाड्या कुठून आल्या ते सांगा. तुमचा फॉर्म्युला सामान्य मराठी माणसांना कळू द्या. हाऊ टु बी अ मिलेनियर हे पुस्तक तुम्ही लिहाच.

कोकण पेटले तर..

नीतेश राणे म्हणाले, सकाळच्या कामगाराला गप्पा बसायला सांगा. हकनाक आरोप सहन करणार नाही. तु बोलशील त्याच्या डबल आम्ही सहन करणार नाही. मोहित कंबोज यांच्या नादी लागू नका. नाही तर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांची नाईट लाईफ बाहेर काढू. उद्या कोकण पेटले तर संजय राऊतला सोडणार नाही.

संबंधित वृत्त

हल्लाबोल:वज्रमूठ बावचळलेल्या, निराश, तोल गेलेल्यांची सभा, लवकरच निवडणुका घेऊन यांना चारीमुंड्या चित करु-देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीची कालची सभा ही सत्ता गेल्याने बावचळलेल्या, निराश आणि तोल गेलेल्यांची सभा होती. निवडणुका योग्यवेळी होतील आणि त्यावेळी आम्ही त्यांना चारीमुंड्या चित करु, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला दिले आहे. कालच्या वज्रमूठ सभेवरुन त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. वाचा सविस्तर