आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसला नारायण राणे कधीच कळलेच नाहीत, त्यांची ताकद काँग्रेसला कधी वापरायलाच मिळालेली नाही अशी खंत नीतेश राणे यांनी व्यक्त केली आहे. तर वांद्र्याच्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंना पाडण्यासाठी संपूर्ण काँग्रेसने शिवसेनेला मदत केली, याच मुळे राहुल गांधींवर ही वेळ आली, असा टोला राणेंनी लगावला आहे.तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा नार्वेकरांना भेटायचे आणि मग काँग्रेस आमदारांना असा दावाही त्यांनी केला आहे.
नीतेश राणे नेमके काय म्हणाले?
आमदार नीतेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलत असताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मैत्री जुनी आहे.ती आजची नाही. ते पहिल्यापासून एक-दुसऱ्याच्या प्रेमात आहेत, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा नार्वेकरांना भेटायचे, आणि मग काँग्रेसच्या आमदारांना असा दावाही त्यांनी केला आहे.
भाजपने राणेंची ताकद ओळखली
आमदार नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, जशी भाजपने नारायण राणेंची ताकद ओळखली आहे. त्यांनी संधी दिली तशी ताकद काँग्रेसला कधी समजली नाही, त्यामुळे त्यांना राणेंची ताकद वापरता आली नाही. मी 12 वर्षे काँग्रेसमध्ये होतो त्यातील 5 वर्षे आमदार देखील होतो. मात्र, मवआ जरी आता अस्तित्वात आली असली तरी काँग्रेसच्या प्रेमात उद्धव ठाकरे आधीपासून आहेत, असे मला वाटते.
काँग्रेसनेच राणेंचा पराभव केला
आमदार नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, वांद्रे पोटनिवडणुकीच्या वेळी अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी नारायण राणे यांच्याकडे ‘तुम्ही वांद्र्याची पोटनिवडणूक लढवा’ असे सांगायला आले होते. सोनिया गांधी यांच्या शब्दाखातर नारायण राणे ती पोटनिवडणूक लढवली. मात्र, तिथे काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मातोश्रीवर सर्व गोष्टी सांगत नारायण राणेंचा पराभव घडवून आणला. काँग्रेसच्या या रणनितीमुळेच राहुल गांधींची ही अवस्था असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.