आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nitesh Rane | Bjp | Marathi News | Maharashtra | Mumbai News | Nitesh Rane Approach In Bombay High Court For Anticipatory Bail In Shivsena Worker Assault Case In Sindhudurg

कुठे आहेत नितेश राणे!:नितेश राणे यांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव; शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी 5 दिवसांपासून आहेत बेपत्ता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी राणे यांनी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला आहे. यावर मंगळवारी तातडीची सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे नितेश यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या निर्णयाविरुद्ध नितेश यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहेत. नितेश राणे नेमके कुठे आहे. याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

मोबाइल जप्त करण्याचे आदेश

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीत सरकारी वकिलांनी संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश यांच्यापर्यंत कसे पोहोचले आहेत, याचे सविस्तर पुरावे कॉल डिटेल्ससह न्यायालयात सादर केले होते व त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश यांचे मोबाइल जप्त करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू उचलून धरत नितेश यांची कोठडीत चौकशी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. या परिस्थितीत नितेश राणे यांना जामीन दिल्यास तपासकामात अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मत न्यायालयाने नोंदवले होते.

बातम्या आणखी आहेत...