आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हिडिओ व्हायरल:शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड, नितेश राणेंनी केली टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, हा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. या घटनेवर भाजपच्या निलेश राणेंनीही टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. आपल्या परळी मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात 81 किलोचा केक आणण्यात आला होता. तो केक बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते कट करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर स्टेजवरील केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. स्टेजवर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. निलेश राणे यांनी यावरुनच निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी सोशल मीडिया म्हटले की, 'मन खचून गेले हे बघून... महाराष्ट्रात ६० वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहीना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या 60 वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते.' असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser