आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nitesh Rane | Marathi News | Latest Update For Nitesh Rane | BJP MLA Nitesh Rane's Pre arrest Bail Will Be Heard In Mumbai High Court Today; Everyone's Attention To The Hearing

संतोष परब हल्ला प्रकरण:नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अटकेची टांगती तलवार कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर राणेचे वकिल अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी अटकपू्र्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना म्याँव म्याँव करुन चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीने आणि सरकारचा दबाव असल्याने या प्रकरणात आपल्याला गोवले जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अर्जात केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावर झाल्याचा आरोप करण्यात आला असून, नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केल्यानंतर अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत आहेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नितेश राणेंच्या वकिलाने जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच देखील आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत.

मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...