आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसात उधाण आले आहे. आता पुन्हा एकदा भाजप आमदार नीतेश राणे यांनी अजितदादांना सगळे माफ असून काही दिवसात चित्रपट रिलीज होईल असे म्हणत सूचक इशारा दिला आहे.
गेल्या महिन्याभरात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरुन वावड्या उठल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्यानंतरही घडणाऱ्या काही घडामोडींमुळे अजित पवारांच्या चर्चा थांबताना दिसत नाहीये. अजित पवार पुण्यातील एका प्रकट मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते.
माझ्या दृष्टीने ते करमुक्त
नीतेश राणे आणि अजित पवार यांच्यातील वादाशी सर्वपरिचित आहेत. आत्तापर्यंत अनेकदा दोघांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे. अजित पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या नीतेश राणेंचा आताचा सूर मात्र मवाळ झालेला दिसून येत आहे. नीतेश राणे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, अजितदादांना सगळे माफ आहे. अजितदादा करमुक्त आहे. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. समजनेवालोको इशारा काफी है. माझ्या दृष्टीने ते करमुक्त आहेत. ते करमुक्त का आहेत ते चित्रपट रिलीज झाल्यावर कळेल.
टिल्ली लोक
महाविकास आघाडीच्या कालच्या सभेत अजित पवार यांनी नीतेश राणेंवर टीका केली. अजित पवार म्हणाले, टिल्ले टिल्ले लोक काही ही बोलत असतात. आपल्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. राज्यात आलिकडच्या काळात वाचाळविरांची संख्या वाढली आहेआपण काय बोलतोय काय नाही. यांचे अनेक शब्द मीडियाला दाखवताही येत नाही. अशा प्रकारचा सत्ताधारी पक्षाचा कारभार चालला आहे.
नीतेश राणे काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या सभेतील टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नीतेश राणे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. नीतेश राणे यावेळी म्हणाले, काल उद्धव ठाकरे आणि अजित दादांनी माझ्या पत्रकार परिषदांचा उल्लेख केला. मात्र अजित दादांना सगळेच माफ आहे. ते करमुक्त आहेत. म्हणून त्यांच्यावर मी काहीही टीका करणार नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांचा सकाळचा भोंगा बंद करावा.
संबंधित वृत्त
राजकीय:उद्धव ठाकरे अस्वस्थ, संजय राऊतमुळे यांच्या घरातील लफडी बाहेर येताहेत; सकाळच्या कामगाराचे तोंड बंद करा-नीतेश राणे
काल उद्धव ठाकरे अस्वस्थ दिसत होते. कारण संजय राऊतमुळे यांच्या घरातील लफडी बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात शांतता हवी असेल तर संजय राऊतचे तोंड बंद करा. खोटेनाटे आरोप करायचे नाही. मुद्द्यावर बोला. जर माझ्या अजून पत्रकार परिषदा झाल्या तर तुमचे महाराष्ट्रात फिरणे बंद होईल, असा इशारा भाजप नेते नीतेश राणे यांनी दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.