आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेब क्रूरच:राणे यांनी आव्हाड यांना दिली मंदिरे पाडल्याची यादी; म्हणाले - तुमचे पाय मात्र रायगडकडे वळाले नाहीत!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगजेब क्रूर असता, तर त्याने विष्णू मंदिर तोडले असते, असे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना नीतेश राणे यांनी आज एक पत्र पाठवून उत्तर दिले आहे. शिवाय औरंगजेब कसा क्रूर होता, त्याने किती मंदिरे तोडली याची यादीही त्यांनी पाठवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर आपण एकदाही नतमस्तक झाला नाहीत किंवा त्यांचे पाय रायगडाच्या दिशेने कधीच वळाले नाहीत, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते आव्हाड?

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे, तर स्वराज्यरक्षक होते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केले होते. त्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केले. भाजपला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, संभाजी महाराज यांचे ज्याठिकाणी डोळे फोडले, तिथे विष्णूचे मंदिर होते. मग औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता किंवा क्रूर असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असतं ना?, असा सवालही त्यांनी विचारला होता. आव्हाडाच्या या प्रश्नालाच पत्र लिहून नीतेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

नीतेश राणे यांचे पत्र

मुबारक्षक

मा. जितेंद्र आव्हाडजी

वंदे मातरम

आपण औरंग्याबाबाबत 'औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?' असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे. कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले. नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही. काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे 'धर्मवीर नाहीत असे घोषित करतो.

औरंगजेबाने धर्मातर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. ​​​औरंग्याने आपल्या आयुष्यामध्ये लहान मंदिरे खूप तोडलेली आहेत, पण प्रामुख्याने जी मोठी मंदिरे त्याने तोडली आहेत, त्याची यादी खाली नमूद केलेली आहे.

१) सोमनाथ मंदिर

२) कृष्ण जन्मभूमी मंदिर

३) काशी विश्वनाथ मंदिर

४) विशवेश्वर मंदिर

५) गोविंददेव मंदिर

६) विजय मंदिर

७) भीमादेवी मंदिर

८) मदन मोहन मंदिर

९) चौंषष्ठ योगिनी मंदिर

१०) एलोरो मंदिर

११) त्र्यंबकेश्वर मंदिर

१२) नरसिंगपूर मंदिर

१३) पंढरपूर मंदिर

बातम्या आणखी आहेत...