आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 पासून सकाळी 9 वाजता भटक्या कुत्र्याचा महाराष्ट्राला त्रास!:नितेश राणेंची विधानसभेत संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2019 पासून सकाळी 9 वाजता भटक्या कुत्र्याचा महाराष्ट्राला त्रास होतो. असे वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना करत खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे राणे कुटुुंबिय यांच्या नेहमीच वाद पाहायला मिळत असतो. यात संजय राऊत यांनी विधीमंडळाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अधिवेशन काळात मोठा गदारोळ झाला. यानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळात चर्चा सुरू असताना अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांचा भटका कुत्रा असा उल्लेख केला आहे.

बच्चू कडू यांचा सल्ला

विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर आज झालेल्या लक्षवेधीत आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अफलातून सल्ला दिला. भटके कुत्रे ते उचला अन् आसामला नेऊन टाका, आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा कळाले तिथे कुत्र्यांना मोठी किंमत आहे. एक कुत्रा आठ हजारांना विकला जातो. आपल्याकडे बोकडे तर तिकडे कुत्रे खातात'' असे म्हणत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी त्यांनी जालीम विलाज सुचवला.

विधानसभेत आज (3 मार्च ) भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी प्रहार संघटनेचे मुख्य आणि आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांना आसामला पाठववे असा अजब सल्ला बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.

हे ही वृत्त वाचा

10 मिनिटे सुरक्षा हटवा, संजय राऊत उद्या दिसणार नाहीत:विधानसभेत नितेश राणेंची आगपाखड, 'चोरमंडळ' वक्तव्यावरुन टीका

विधिमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने आज विधिमंडळात सत्ताधारी आक्रमक झाले. शिवसेना व भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

आमदार नितेश राणे यांनी तर संजय राऊतांची सुरक्षा 10 मिनिटे हटवा. उद्या संजय राऊत दिसणार नाहीत, अशा शब्दांत विधानसभेतच संजय राऊतांवर आगपाखड केली. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...