आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा सालियानच्या मृत्यूमध्ये नवीन ट्विस्ट:दिशाच्या मृत्यूच्या दिवशी सचिन वाझेची कार तिला घरी सोडायला आली होती का? नितेश राणेंचा सवाल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली होती आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतला तिच्या हत्येचे रहस्य माहित होते, त्यामुळे त्याचीही हत्या करण्यात आली, असा आरोप केला होता. आता त्यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा खुलासा केला आहे. राणे यांनी सोशल मीडियावर दिशाच्या मृत्यूचा संबंध अँटिलिया प्रकरणी तुरुंगात असलेले बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेशी जोडून तीन पोस्ट लिहिल्या आहेत.

नितेश राणेंचे आरोप

  1. नितेश राणे यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, '8 तारखेच्या रात्री (दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी) दिशाला एका पार्टीतून तिच्या मालाडच्या घरी काळ्या मर्सिडीजमध्ये सोडण्यात आले होते. सचिन वाझेजवळ एक काळ्या रंगाची मर्सिडीज कार आहे. ज्याची अद्याप चौकशी सुरू आहे. ही तीच कार आहे का? वाझेला 9 जून रोजी मुंबई पोलिसात दाखल करण्यात आले होते. त्याचे कनेक्शन काय आहे?'
  2. पुढच्या ट्विटमध्ये नितेश राणेंनी लिहिले की, 'मालवणी पोलिस स्टेशनने या प्रकरणी फ्री आणि फेयर तपास केला नाही, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. आता त्यांना दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. आता त्याच पोलिस स्टेशनला राज्य महिला आयोगाद्वारे रिपोर्ट देण्यास सांगितले आहे? हे कितपत योग्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?'
  3. दुसर्‍या ट्विटमध्ये राणेंनी लिहिले की, 'मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले आणि त्यानंतर त्यांनी दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलिस स्टेशनकडून अहवाल मागितला. ही एक मोठी कव्हर अप योजना आहे आणि राज्य सरकारच्या वतीने हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की, 8 जूनच्या रात्री काहीही घडले नाही. चला मला आनंद आहे की, अखेर ते आपली कबर खोदत आहेत'

शिवसेनेने महिला आयोगाकडे केली आहे तक्रार

काही दिवसांपूर्वी दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप केला होता. याप्रकरणी शिवसेना नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. रुपाली चाकणकर यांना लिहिलेल्या पत्रात राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करताना कारवाईची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात महापौरांनी म्हटले आहे की, 'सीबीआयने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा तपासही पूर्ण केला असून त्यासोबतच दिशा हिच्यावर बलात्कार झाला नाही किंवा ती गरोदरही नव्हती असे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तिच्या पालकांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एवढेच नाही तर मुलीच्या मृत्यूनंतरही तिची बदनामी होत असल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे दिशाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई केली जावी असे पालक म्हणाले आहेत. तसेच नारायण राणे वारंवार पत्रकार परिषद घेऊन बलात्कार आणि हत्येचा आरोप करत आहेत, याला आळा घालावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती
दिशा सालियन हिने 8 जून रोजी मुंबईतील मालवणी भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या एका आठवड्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही आत्महत्या केली. अशा स्थितीत या दोन्ही प्रकरणांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात आला. दिशा अभिनेता रोहनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाऊननंतर दोघेही लग्न करणार होते. त्यानंतरचपासून राणे कुटुंबीय यात मोठा राजकीय चेहरा असल्याचा आरोप सातत्याने करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...