आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली, असे म्हणणाऱ्या संजय राऊतांनी स्वतःचीच लंका जाळली. स्वतःच्या करंटेपणाने आपल्या मालकाला रस्त्यावर आणले, असे म्हणत भाजप नेते तथा आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
नीतेश राणे म्हणाले, ज्या व्यक्तीने साधी सरपंचाची निवडणुक लढवलेली नाही, ती व्यक्ती कर्नाटक निवडणुकांवर बोलत आहे. ज्याला राजकारण समजते तो बावळट संजय राऊत सारखे बोलणार नाही. बजरंगबलीची गदा भाजपच्याच डोक्यावर पडली म्हणणाऱ्या राऊतांनी स्वतःचीच लंका जाळली आहे. स्वतःच्या करंटेपणाने मालकाला रस्त्यावर आणले.
लोकप्रभात घाणेरड्या भाषेत लिहिले
नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले, संजय राऊत निष्ठेबद्दल बोलत असेल तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. लोकप्रभेत काम करताना याच संजय राऊतांनी शिवसेना, बाळासाहेब, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकप्रभा दैनिकात घाणेरड्या भाषेत लिहिले होते.
गांधी लायकी काढतात
नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत गेले होते. ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते गेले होते त्या उमेदवाराबद्दल बोला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार काँग्रसमुळे मागे पडले. मराठी माणसाबद्दल एवढेच प्रेम असेल तर राहुल गांधींना सांगायचे होते याठिकाणी उमेदवार देऊ नका. गांधी तुझी लायकी काढतात, वॉचमनच्या जागी तुला बसवतात.
वाझे-उद्धव ठाकरेंचे काय संबंध?
नीतेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना एकच सांगायचे आहे की, राऊत तुम्हाला महाराष्ट्रात खड्डयात टाकणार आहे. बाळासाहेबांच्या घराण्याला संपवायची सुपारी राऊतांनी घेतली आहे. जो जो भ्रष्टाचार करेल त्याला सोडणार नाही, ही मोदींची भूमिका आहे, त्यामुळे वानखेडेंवर कारवाई झाली. सचिन वाझे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध होते, वसुलीचे किती टार्गेट वाझेला दिले होते, याबाबत माहिती दे.
स्वतःचे जळत असताना...
नीतेश राणे म्हणाले, दिशा सालियन खून, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावेळी वाझेंना सेवेत घेतले. दिशा सालियान खून प्रकरणात सचिन वाझेंचा काय संबंध होता, यावर बोलयला हवे. आदित्य ठाकरेंचे प्रकरण साफ करण्यासाठी त्यांना ठेवले होते. आधी यावर बोल. स्वतःचे जळत असताना दुसऱ्यांवर टीका करु नका, असा सल्ला नीतेश राणेंनी संजय राऊतांना दिला.
संबंधित वृत्त
पराभव मान्य करा:हनुमानाला प्रचारात उतरवले, पण बजरंगबलीची गदा भाजपच्याच डोक्यावर पडली; संजय राऊतांचा मोदी-शहांना टोला
हनुमानाला प्रचारात उतरवले होते, मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकातून समोर आली, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.