आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा होता. त्यामुळेच संजय राऊतांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले, असा गंभीर आरोप भाजप नेते नीतेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. तसेच संरक्षण सोडून बाहेर या पाय हातात देऊ, असा इशारा यावेळी राणेंनी दिला आहे.
कर्नाटक निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. तर भाजपचा याठिकाणी पराभव झाला आहे. भाजपच्या या पराभवावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. संजय राऊतांच्या या टीकेला नीतेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी संरक्षण सोडावे मी देखील माझे संरक्षण सोडून येतो मग बघू, असा इशारा राणेंनी दिला आहे.
काय म्हणाले होते राऊत?
हनुमानाला प्रचारात उतरवले होते, मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकातून समोर आली, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती.
नीतेश राणे म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शहांवर टीका करणाऱ्या राऊतांची लायकी काय? असा सवाल राणेंची उपस्थित केला. राऊतांनी जीभ जागेवर नाही ठेवली तर. झाकनझुल्या ऐपतीत राहून. राऊत 3 महिन्यात जेलमध्ये जाणार असल्याचा इशारा राणेंनी दिला.
90 दिवसांचा पाहुणा
नीतेश राणे म्हणाले, राहुल नार्वेकर यांनी न्याय द्यावा अशी तुम्हाला अपेक्षा आहे, मात्र तुम्ही त्यांना धमक्या देत आहेत. तुझे संरक्षण बाजूला ठेवून ये. जे नियमात आहे, कायद्याच्या चौकटीत आहे राहुल नार्वेकर निर्णय घेतील. तुला काय करायचे ते कर. 3 महिन्यात राऊत जेलमध्ये जाणार. बाहेरचा 90 दिवसांचा पाहुणा आहे.
मविआ सरकार पाडले
नीतेश राणे म्हणाले, नाना पटोले राजीनामा देणार हे राऊतांना माहित होते, मग त्यांनी कोणाला का सांगितले नाही. संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे होते मविआ सरकार पाडले. आजच्या बैठकीच राऊतांना निमंत्रण नाही, याने शरद पवारांना विनंती केली मला येऊ द्या मी स्टुलवर बसतो. शिवसेना नाव गेल्यापासून यांचे अस्तित्व काय, सर्व निवडणुकांमध्ये पडले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.