आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान मोदी मनकी बात करतात तर उद्धव ठाकरेंना केवळ धन की बात समजते. कोकणात ते कोकणवासियांसाठी नव्हे तर स्वतःच्या घराची चूल पेटवण्यासाठी आले आहेत. उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत, अशाप्रकारची सणसणीत टीका भाजप नेते नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
बारसू दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. बारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. हुकूमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना-भाजपने समर्थकांचा मोर्चा काढला होता. यावेळी नीतेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पेटवापेटवीचा प्रकार
भाजप-शिवसेनेच्या प्रत्युत्तर मोर्चात बारसू रिफायनरी प्रकल्पाचे समर्थक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना नीतेश राणे म्हणाले, बारसूत उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टर उतरु दिले नाही. त्यामुळे तिकडे सोलगावात उतरावे लागले. त्याठिकाणी उद्धव ठाकरेंनी आल्याआल्या पेटवापेटवीचा प्रकार केलेला आहे. तेथूनच ते मुंबईला परतणार आहेत.
घराची चूल पेटवण्यासाठी आले
नीतेश राणे म्हणाले, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 वर्षापासून मन की बात करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे धन की बात समजतात. ते इकडे आपल्या घराची चूल पेटवण्यासाठी आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बारसूत रिफायनरी होण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना पत्र दिले होते. आता सत्तेत नाही तर विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत.
कुठला व्यवसाय करतात?
नीतेश राणे म्हणाले, ठाकरेंच्या मातोश्रीवर खोके पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी दिलेल्या समर्थनाच्या एका पत्राची किंमत 100 कोटी होती. उद्धव ठाकरे याठिकाणी हेलिकॉप्टरने आले ते कुठला व्यवसाय करतात? त्यांचे धंदे कोणते? याबाबत त्यांनी स्पष्ट करावे. या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगार मिळत आहे, व्यवसाय, शाळा, हॉस्पिटल उभे राहत आहेत.
कोकणात रोजगार आलाच पाहिजे
नीतेश राणे म्हणाले, हे लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी येत आहेत. मात्र कोकणात रोजगार आला पाहिजे. हा मोर्चा एक झलक होता. या प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नारायण राणे सकारात्मक आहेत. विरोधातील लोकांनाही विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.