आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातल्या दंगलींसाठी कोणी जबाबदार असेल तर उद्धव ठाकरेच आहेत. 1999 पासून त्यांना मुख्यमंत्रिपदाची लालसा होती त्यासाठी त्यांनी दंगली घडवण्याचे आदेश दिले होते,असा थेट आरोप भाजप नेते नीतेश राणे यांनी केला आहे. गृहमंत्रालयाने याचा तपास करावा, असेही राणे यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलतीना संजय राऊतांनी कर्नाटक निवडणुकांवरुन भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत म्हणाले की, देशाचे पंतप्रधान महिनाभर कर्नाटकात तंबू ठोकून होते. गृहमंत्री आणि सर्व मंत्री कर्नाटकात प्रचार करत होते. पण कर्नाटकात इतिहास घडेल, 2024 साठी शुभसंकेत होईल. भाजपचा दारूण पराभव होणार आहे. हा पंतप्रधानांचा पराभव असेल.
महाराष्ट्राला पुरावे देऊ का?
संजय राऊतांचा नीतेश राणेंनी त्यांच्याच भाषेत समाचार घेतला आहे. नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. तर तुम्ही टीका करत राहा आम्ही आदित्य ठाकरेंचे कपडे फाडत राहू. संजय राऊत लँडमाफिया आहे. याचे पुरावे महाराष्ट्राला देऊ का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
लोकांच्या जमिनी बळाकावल्या
नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले, संजय राऊतने अलिबागला एक प्लॉट मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावाने दमदाटी करुन विकत घेतला. राऊतांनी किती लोकांच्या जमिनी बळाकावल्या आहेत याचा हिशोब द्यावा. आमच्या लोकांवर तोंडसुख घेण्यापेक्षा तुझे बघ, असा थेट इशारा राणेंनी दिला.
चुकीच्या माणसाला मतदान करु नका
नीतेश राणे म्हणाले, कैदी नं 8959 संजय राऊत आज बेलवर बाहेर आहे. गेल्या 9 महिन्यांपासून संजय राऊत अशांतता पसरवण्याचे काम करत आहे. बेळगावच्या लोकांनी राऊतांचे ऐकून चुकीच्या माणसाला मतदान करु नका, असे आवाहन मी त्यांना करतो.
ठाकरेंकडून दंगलींचे प्लॅनिंग
नीतेश राणे म्हणाले, महायुतीच्या सरकारवर दंगली भडकावण्याचे आरोप उद्धव ठाकरे करत आहेत. 1993-93 च्या दंगलीनंतर शिवसेनेचे सरकार आले तसे प्लॅनिंग उद्धव ठाकरे करत होते. मुस्लमानांवर हल्ले करण्याचे आदेश ठाकरेंनी दिले होते. त्या दंगलींचा फायदा शिवसेनेला होईल, याबाबत उद्धव ठाकरेंना मला प्रश्न विचारायचा आहे असे आदेश तुम्ही दिले नव्हते का? याचे उत्तर द्या. गृहमंत्रालयाने याबाबत तपास करायला हवा.
आम्ही फटकावण्याची भाषा करू
नीतेश राणे म्हणाले, अग्रलेख कोणाच्या सांगण्यावर लिहित आहेस? उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावर करत आहात का जाहिर करा. संजय राऊत राष्ट्रवादीत जाण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, गृहमंत्रालय आव्हाडांच्या वक्तव्याची दखल घेईल. तुम्ही लटकावण्याची भाषा कराल तर आम्ही सुद्धा फटकावण्याची भाषा करु.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.