आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फडणवीसांचे कौतुक:'आमचा योद्धा इतका फिरला की सत्ताधाऱ्यांची हवा निघाली', नितेश राणेंकडून फडणवीसांचे कौतुक, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कौतुक केले आहे. तसेच त्यांनी या ट्विटमधून अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'आमचा योद्धा इतका फिरला की सत्ताधाऱ्यांची हवा निघाली,' असं ट्विट नीतेश राणे यांनी केलं आहे. यासोबतच फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फडणवीसांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नीतेश राणे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कर्तृत्ववान, संवेदनशील, कार्यतत्पर, प्रभावशाली, कणखर नेतृत्व, अभ्यासपूर्ण दुरदृष्टी असलेले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते  #श्री_देवेंद्रजी_फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असं म्हणत नितेश राणेंनी शुभेच्छा दिल्या. 

यापूर्वी नितेश राणेंनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले तर अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. यीनध्ये त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांवर नाव न घेता टीका केली आहे. 'आमचा योद्धा इतका फिरला की Papa penguin आणि Baby penguin ची A.C चालु न करता..हवाच निघाली!! असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच काहीही करा, चिरफाड तर होणारच, असंही ते म्हणाले आहेत. 

Advertisement
0