आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपुरातील धर्मांतरावरून लक्षवेधी:नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केले धर्म परिवर्तनाचे रेट कार्ड

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सभागृहात लक्षवेधीमध्ये धर्म परिवर्तनाचा मुद्दा मांडला. यावेळी श्रीरामपुरातील धर्मांतरावरून नितेश राणे यांनी विधानसभेत धर्म परिवर्तनाचे रेट कार्ड सादर केले. हिंदु मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली.

अहमदनगरमधील मराठी मुलीचे धर्मपरिवर्तन झाल्याची घटना नुकतीच घडली. हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते, असे म्हणत नितेश राणे यांनी सभागृहात रेटकार्ड वाचून दाखवले. नितेश राणेंच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. धर्मांतर विरोधी कायदा अधिक कडक करू, असे ते म्हणाले.

धर्मांतर करुन मुलीवर अत्याचार
श्रीरामपुरात एका अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने 2019 मध्ये 13 वर्षाची असताना पीडितेला बळजबरीने शाळेतून उचलून नेले आणि तिचे धर्मांतर केले. त्यानंतर तिच्याशी निकाह करुन तीन वर्षापासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांनी सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...