आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना अटकेपासून दिलासा:नितेश राणेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, 7 जानेवारीला अटकपूर्व जामीनावर होणार सुनावणी; अटकेच्या भीतीने राणे आठवडाभरापासून अज्ञातवासात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी कोर्टाकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांची अटक तूर्तास टळली आहे. प्रतिज्ञापत्र सादर होत नाही तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नाही अशी तोंडी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.

त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता पुन्हा शुक्रवारी अर्थात 7 जानेवारी रोजी होणार आहे. अटकेच्या भीतीने नितेश राणे तब्बल आठवडाभरापासून अज्ञातवासात आहेत. मात्र, आता अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्याने ते अज्ञातवासातून बाहेर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...