आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:वाट लागल्यावर शिवसेनेला लगेच मराठी माणुस आठवणार; आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील, नितेश राणेंचा खोचक टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. आतापर्यंत जमा करण्यात आलेले पुरावेसीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे. यानंतर शिवसेनेने सामना अग्रलेखातून या निर्णयावर टीका केली.

दरम्यान यानंतर आता भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय :1.) मराठी अस्मिता, 2.) महाराष्ट्र धर्म, 3.) मराठी माणूस Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा Dino, Jacqueline, disha पाहिजे असतात..वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस! ' असे म्हणत त्यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकणार नाही. पाटण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर सर्वसमावेश असल्याचे सांगून न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...