आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण:नीतेश राणेंकडून नवा व्हिडिओ ट्विट; आदित्य ठाकरेंना नाव न घेता 'सत्य बाहेर येईल' असा इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एक नवा नीतेश राणे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत नवा ट्विस्ट निर्माण केलाय. यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येतील, असा इशारा त्यांनी त्यांचे नाव न घेता दिलाय.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण येत्या काळात पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झालीय. दुसरीकडे विधिमंडळात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशीची घोषणा झालीय. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढल्याची चर्चाय.

म्हणाले, न्याय मिळेल

सुशांतसिंह आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची राळ दिवसेंदिवस जास्तच उडताना दिसतेय. आता नीतेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करून पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता थेट इशारा दिलाय. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात , आता हे स्पष्ट आहे की, 'एसएसआर'चा मृतदेह घेऊन जाणारे रूपकुमार शाह होते. 'पीएम' दरम्यानन ते तिथे होते. अखेर सत्य बाहेर येतेय. आता बेबी पेंग्विनला दरवाजा नाही. न्याय मिळेल.!'

कोण आहेत शाह?

रूपकुमार शाह यांनी सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झालाचा दावा केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आहेत. सुशांतच्या मृतदेहावर जखमेचे व्रण होते. त्याचे शवविच्छेदन करताना आपण तिथे उपस्थित होतो, असा दावा त्यांनी केलाय. शिवाय त्याचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी राजकीय दबाव होता, असा आरोपही त्यांनी केलाय. रूपकुमार शाह हे 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहात नोकरीवर होते. त्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या आरोपानंतर शाह यांना सुरक्षा पुरवण्यात आलीय.

'एसआयटी'ची स्थापना

विधिमंडळ अधिवेशनात सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी आरोप केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची 'एसआयटी'ची स्थापना करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे या प्रकरणाची नव्याने चर्चा सुरूय झालीय. शिवाय ठाकरे यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...