आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभागृहाबाहेर जुंपली:लव्ह जिहादवरून आमदार नीतेश राणे - अबू आझमींमध्ये विधानभवन परिसरात रंगली खडाजंगी

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात भाजप आमदार नीतेश राणे आणि समाजवादी पक्षाच आमदार अबू असीम आझमी आमने-सामने आलेले दिसले. ग्रीनझोनमध्ये अनधिकृत मदरसा उभारला जात असल्याचा दावा यावेळी नीतेश राणे यांनी केला.

कोणत्याही धर्माचे अनधिकृत बांधकाम असले, तर ते तोडले पाहिजे, असे उत्तर आझमी यांनी दिले. मात्र, कारवाई करायला सुरुवात केल्यानंतर हत्यारे बाहेर काढली जातात. तुम्ही माझ्यासोबत चलाच. मी तुम्हाला दाखवतो, असे आवाहन नीतेश यांनी केले. मात्र, कधीही तुमच्यासोबत येईल. मात्र, हे खोटे आहे, असा दावा आझमी यांनी केला.

मदरशावरून सुरुवात...

मदरशाचे प्रकरण लव्ह जिहादवर आले. लव्ह जिहाद होतो, हे तुम्हाला मान्य करावे लागेल. माझे चॅलेंज आहे. वार आणि तारीख सांगा. मी तुम्हाला घेऊन जातो. तुम्हाला घरातून पिकअप करतो, असे नीतेश राणे म्हणाले. त्यानंतर आझमी यांनी प्रेमाचे नाते असावे, असे आाहन केले. मात्र, राणे यांनी तुम्ही तसे बोलता, पण दुसऱ्यांचे विचार तसे नाहीत. तुमच्यासारखे मोजके लोक आहेत. इतर तसे नाहीत, असा दावा केला.

बरबाद करणे सुरू...

माध्यमांशी बोलताना अबू आझमी म्हणाले की, लव्ह जिहादचे एकही प्रकरण नाही. काही जण या देशात हिंदूमध्ये मुस्लिमांची प्रतिमा मलीन करून देशाला बरबाद करू पाहत असल्याचा दावा केला. तसेच लव्ह जिहादचे एकही प्रकरण नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

त्यामुळे तडफड सुरू...

नीतेश राणे म्हणाले की, लव्ह जिहाद आणि धर्मांतराबाबत मी खरी माहिती देत असल्याने त्यांना खटकले. त्यांची तडफड होत आहे. आपली पोलखोल होईल, अशी भीती वाटत आहे. मात्र, हिंदू तरुणींचे आयुष्य बरबाद होईल. तेव्हा हे पुढे येतील का, असा सवाल त्यांनी केला. तसेच आझमींसारखा ज्येष्ठ माणूस मुलींचे आयुष्य बरबाद करत असेल, तर हे योग्य नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...