आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nitesh Rane Vs Aditya Thackeray: Nitesh Rane Repents A Day After Criticizing Aditya Thackeray And DNA Remark Controversy Latest News And Updates

नितेश राणेंचा तोल सुटला:शिवसैनिक संतप्त होताच नितेश राणेंनी शब्द घेतले मागे; आदित्य ठाकरेंच्या डीएनएवर केली होती आक्षेपार्ह टीका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजप आमदार नितेश राणेंना उपरती आली आहे. विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरेंच्या कामगिरीवर टीका करताना नितेश यांचा तोल सुटला होता. आता मात्र, शिवसैनिक संतप्त झाल्याचे पाहून त्यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसैनिकांनी राडा केला.

नेमके काय घडले?
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन झाले. केवळ 2 दिवसांच्या या अधिवेशनात आमदारांचे निलंबन हाच मोठा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला. निलंबनाच्या कारवाईवर भाजप नेत्यांकडून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी याचा निषेध व्यक्त करताना कुठल्याही भाजप आमदाराने सभागृहात हजेरी लावली नाही. उलट सभागृहाबाहेरच प्रतिविधानसभा भरवली आणि सरकारविरोधात रोष व्यक्त केला. याच ठिकाणी राजकीय वादंगामध्ये नितेश राणेंचा तोल सुटला आणि त्यांनी वादग्रस्त विधान केले.

ठाकरेंच्या डीएनएवर केली होती टीका
महाविकास आघाडी सरकारवर एकानंतर एक भाजप आमदार टीका करत होते. त्याच आमदार नितेश राणे यांनी उडी घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांची कामगिरी पाहता हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह विधान नितेश यांनी केले होते.

नितेश यांच्या विधानावर शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन करून नितेश राणे आणि भाजपचा निषेध करत आपला रोष व्यक्त केला. यात नितेश यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. नितेश राणेंनी तत्काळ आदित्य ठाकरे आणि शिवसेनेची माफी मागावी. तसेच यापुढे सांभाळूनच बोलावे अशी ताकीद शिवसैनिकांनी दिली. यानंतर नितेश यांनी एक ट्विट जारी करून आपली चूक मान्य केली. आदित्य ठाकरेंचा उल्लेख करून टीका केली, त्याचा काही जण चुकीच्या पद्धतीने अर्थ काढत आहेत. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो असे नितेश यांनी लिहिले.

बातम्या आणखी आहेत...