आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधिमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने आज विधिमंडळात सत्ताधारी आक्रमक झाले. शिवसेना व भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आमदार नितेश राणे यांनी तर संजय राऊतांची सुरक्षा 10 मिनिटे हटवा. उद्या संजय राऊत दिसणार नाहीत, अशा शब्दांत विधानसभेतच संजय राऊतांवर आगपाखड केली.
संजय राऊतांचे रोज का ऐकायचे?
विधानसभेत नितेश राणे म्हणाले, संजय राऊतांचे रोजच ऐकावे लागत आहे. महाराष्ट्राला याची गरज आहे का? मुळात संजय राऊत यांचा आणि शिवसेनेचा संबंध काय? शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये लिहिण्याआधी संजय राऊत लोकप्रभा दैनिकात लिहायचे. या दैनिकात संजय राऊत शिवसेनेविरोधात लेख लिहायचे. संजय राऊत यांची हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंविरोधात लिहिण्याची मजल गेली होती. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही, असे लेख संजय राऊतांनी लिहितेत. आजही विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असे म्हणत त्यांनी संपूर्ण विधिमंडळाचाच अपमान केला आहे.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांचे पोलिस संरक्षण काढा. उद्या सकाळी संजय राऊत दिसणार नाहीत.
संजय राऊतांचे नेमके वक्तव्य काय?
विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचे विधानभवनातही तीव्र पडसाद उमटले.
संजय राऊत म्हणाले, आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीसांनीही राऊतांना सुनावले
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. संजय राऊत हे विधानमंडळाला चोर म्हणत आहे. पण उद्धव ठाकरे हे याच सभागृहाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्वच चोर ठरतोय का असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर
संबंधित वृत्त
संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहात गोंधळ:दिवसभरासाठी कामकाज तहकूब; वक्तव्याची चौकशी होणार, विधानसभा अध्यक्षांची घोषणा
संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर खासदार संजय राऊत यांना अटक करा, अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.