आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचे फडणवीसांना पत्र:म्हणाले- आदित्यसेनेच्या उलट्या बोंबा, सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्या

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेने मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलट्या बोंबा मारणे सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे. अशाप्रकारचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे.

नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली आहे. पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एस.आर.ए. मधील झोपडपट्टीधारक खासगी विकासकांची नेमणुक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षाचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सहा-सहा तास प्रवासात

पुढे नितेश राणेंनी म्हटले आहे, एका बाजूला कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी गेली. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा-सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागत आहेत. राहते घरे विकासकाने अडवून ठेवलेय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होतेये. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडेही मिळतेय.

विकासकांवर कडक कारवाई

राणे म्हणाले, नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वतः दरात विकण्यास बाध्य होतात. अशा प्रकरणांमध्ये सरकारच्यावतीने ठोस पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार तथा केंद्रिय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...