आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला:राज ठाकरेंच्या भेटीसाठी नितीन गडकरी शिवतीर्थावर; मनसे-भाजप जवळीक वाढणार का?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची भेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर सुरू आहे. शनिवारी राज ठाकरे यांनी गुडी पाडवा मेळाव्यात केलेल्या हिंदुत्वाच्या विधानानंतर ही भेट होत असल्याचे कळते.

राज ठाकरे यांनी केलेल्या मस्जिदीच्या वक्तव्याचे कौतुक भाजपकडून करण्यात आले होते. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे मनसे भाजप जवळीक वाढणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाविकास आघाडी पाडण्यासाठी प्रयत्न
राज्यातील महाविकास आघाडी पाडण्यासाठी राज्यात विरोधात बसलेली भाजप नेहमी प्रयत्नशील आहे. राज ठाकरे पुर्वी भाजपचा लाव रे व्हिडिओ म्हणायचे मात्र केंद्राकडून ईडीची नोटीस मिळाली म्हणून, त्यांना हनुमान चालिसा आठवली. अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. हा संपुर्ण डाव महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी सुरू आहे. राज ठाकरे यांच्या रेल्वेच्या इंजनात आता भाजप इंधन भरते आहे. 2006 पासून मनसेने निवडणुकीत वेगवेगळे प्रयोग केले मात्र, ते यशस्वी ठरले नाही, त्यामुळे मनसेला कुठे तरी असे वाटत असेल की, भाजपसोबत येऊन काहीतरी होईल. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...