आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना थेट भगवान श्रीकृष्णाशी केली आहे. योगी हे श्रीकृष्णाप्रमाणे समाजकंटकांविरोधात कठोर पावले उचलत असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी हे विधान केले.
काय म्हणाले गडकरी?
सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये 10 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपुजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कामांचे कौतुक केले. “योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. महोबा ही वीर योद्ध्यांची भूमी आहे. या भूमीला समृद्ध इतिहास आहे. झाशी-खजुराहो रस्त्याच्या निर्मितीमुळे राज्याच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमेवर असलेल्या कबराई सेक्शनच्यामुळे भोपाळ-कानपूर औद्योगिक क्षेत्राकडून लखनऊकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल आणि वेळेची बचत होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जेंव्हा पृथ्वीवर अन्याय होतो..
योगी आदित्यनाथा यांची थेट भगवान श्रीकृष्णाशी तुलना करत म्हणाले, "काही दिवसांपूर्वीच माझ्या पत्नीने विचारले की उत्तरप्रदेशात काय सुरू आहे? भागवत गीतेचा दाखला देत ती म्हणाली, जेंव्हा जेंव्हा पृथ्वीवर अन्याय वाढतो तेंव्हा तेंव्हा श्रीकृष्ण जन्म घेतात. खरे तर योगी आदित्यनाथ यांनी श्रीकृष्णाप्रमाणे वाईट प्रथा आणि समाजकंटकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत.यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.