आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:नाना पटोलेंविरुद्ध नितीन राऊतांची सोनियांकडे तक्रार, ऊर्जा खाते सोडावे म्हणून दबाव येत असल्याचा दावा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. ऊर्जा खाते सोडून विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून आपल्याविरोधात पक्षांतर्गत कारवाया केल्या जात असल्याचे राऊत यांनी सोनियांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राऊत यांनी दिल्लीतील १० जनपथ येथे गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी खनिकर्म विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मध्यंतरी पत्र पाठवून तक्रार केली होती. खनिकर्म मंडळाकडून ऊर्जा विभागाची महाजनको कंपनी कोळसा खरेदी करते. पटोले यांच्या तक्रारीचा रोख ऊर्जा विभागाला बदनाम करणे असा होता, असा पाढा राऊत यांनी वाचल्याचे समजते. कोरोनाच्या काळात सोनिया गांधी पदाधिकाऱ्यांना सहसा भेटत नाहीत. पण राऊत यांना भेटून साेनियांनी २० मिनिटे चर्चा केल्याने पक्षातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राऊत शुक्रवारी दिल्लीत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीतच होते. याविषयी थोरात यांना विचारले असता प्रदेश काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत. राऊत पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यासंदर्भात ते भेटले असावेत, अशी सारवासारव थोरात यांनी केली.

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्षपद सोडताना पटोले यांना राहुल गांधी यांनी मंत्रिपदाचे वचन दिले हाेते. ऊर्जा विभागासाठी पटोले इच्छुक आहेत. त्यामुळे राऊत यांना विधानसभा अध्यक्ष करावे, अशी मोहीम पक्षात चालवली जात आहे. त्यातून राऊत आणि पटोले या विदर्भातील काँग्रेसच्या दोघा नेत्यांमध्ये संबंध ताणले गेले आहेत. राऊत पक्षाचा राज्यातील दलित चेहरा आहेत. राऊतांना काढणे पक्षाला अडचणीचे आहे. सोनियांना भेटल्यानंतर राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांची भेट टाळली.

बातम्या आणखी आहेत...