आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या विरोधात देशभरातील अधिकाधिक पक्षांनी एकजूट दाखवावी. आणि आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढू. याच उद्देशाने आज आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मातोश्रीवर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, त्यांच्यावर (उद्धव ठाकरे) अन्याय झाला होता. सुप्रीम कोर्टाचा ज्या प्रकारचा निर्णय आला आहे, तो खूप चांगला आहे, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनीही सांगितल्याचे ते म्हणाले.
केंद्राचा मोठा दबाव
नितीश कुमार पुढे म्हणाले की, पक्षाचे नाव कोणी कसे बदलू शकते, याचे मला आश्चर्य वाटते. आज जे केंद्र सरकारमध्ये आहेत ते संपूर्ण देशात कोणतेही काम करत नाहीत. या देशात यापूर्वी बरेच काम झाले आहे. प्रसारमाध्यमांवरही केंद्र सरकारचा मोठा दबाव आहे. यामुळेच विविध राज्यांतील अन्य पक्षांच्या सरकारांनी केलेल्या कामांची चर्चाही होत नाही.
आपापसात वाद नको
केंद्र सरकारवर आरोप करताना नितीश कुमार म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आपापसात कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यावेळी आपापसात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण देशाच्या विकासासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्यात एकता असणे आवश्यक आहे.
विरोधी पक्षांची बैठक
नितीश कुमार यांनी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. याआधी इतर पक्षांच्या नेत्यांचीही भेट झाली आहे आणि लवकरच सर्व भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहितीही नितीशकुमार यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि आमचा विचार एकच आहे, देशहितासाठी काम करणे. देशाचा इतिहास अबाधित रहावा हा आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे.
त्यांचे देशासाठी काम नाही
नितीश कुमार म्हणाले की, हे लोक (भाजप) देशासाठी काम करत नसून फक्त स्वतःसाठी काम करत आहेत. त्यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी काही देणे-घेणे नाही. हे लोक (भाजप) आपापल्या परीने वेगवेगळ्या गोष्टींना फक्त नामकरण करत आहेत. आम्ही सर्वांनी जर संघटित होऊन भाजपच्या विरोधात लढले तर मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांचा चेहरा कोण?
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पत्रकारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विचारले की, विरोधकांचा चेहरा कोण असणार? या प्रश्नाचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मला सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र करायचे आहे, असे करून मला स्वतःचे काही करायचे नाही. मला विरोधी पक्षाचा चेहरा बनायचे नाही. जो कोणी होईल, आम्ही सर्व मिळून त्याला पुढे नेणार असल्याचे ते म्हणाले.
संबंधित वृत्तः
40 आमदारांचे बंड ते आजचा खंडपीठाचा निकाल, वाचा राज्यातील सत्तासंघर्षात केव्हा काय व कसे घडले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.