आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2024 साठी विरोधकांची तयारी सुरू:नितीश कुमार यांचा मुंबई दौरा; 11 मे रोजी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची घेणार भेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहे. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षाचे एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

देशभरात भाजपच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सध्या पुढाकार घेतला आहे. नितीश कुमार देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असून ते विरोधकांची जमवा जमव करत असल्याचे दिसून येत आहे. नितीश कुमार हे 11 मेे रोजी मुंबईत दाखल होणार असून उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात विरोधी पक्षाच्या रणनितीवर चर्चा करणार आहेत.

पंतप्रधानपदामुळे अडकले

विरोधी पक्षात पंतप्रधान पदासाठी अनेक जण इच्छूक असल्याने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या विरोधात एकाही नावावर एकमत होत नाही. मात्र, असे असले तरी नितीश कुमार यांनी उत्तर प्रदेशातील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलगंणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली आहे. यानंतर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नितीश कुमार थेट मातोश्रीवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

विरोधकात एकमत नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अनेक राज्यामंध्ये जात आपल्या पक्षाचा प्रचार करणे, किंवा त्या राज्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनीही अनेक राज्यातील प्रमुख नेत्याच्या भेटी घेतल्या आहेत. यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याने विरोधकांमध्ये पंतप्रधान पदावरुन एकमत नसल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षात शरद पवार, नितीश कुमार, केसीआर, ममता बॅनर्जी असे अनेक बडे नेते पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात. मात्र शराद पवारांनी यानंतर कोणतीही निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले होते. यामुळे आता विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावर विरोधकांचे एकमत होताना दिसून येत नाहीये.