आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सीबीआय चौकशी नाहीच:सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्टोक्ती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुब्रह्मण्यम स्वामींनी मोदींना तर रिया चक्रवर्तीने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली होती मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज नाही असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्याच्या सहकाऱ्यांसह अनेकांकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर फॅन्सने सुद्धा ही मागणी लावून धरली. एवढेच नव्हे, तर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहून महाराष्ट्र सरकारला सांगण्याची विनंती केली होती. यानंतर सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परंतु, महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशी होणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांकडून सर्वच अँगलने तपास

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबई पोलिस अशा कुठल्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे, सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज नाही. सुशांत प्रकरणावर सीबीआय चौकशी करण्यासाठी मीडियावर सुरू असलेल्या कॅम्पेनची मला माहिती आहे. परंतु, मुंबई पोलिस सक्षम आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात प्रोफेशनल मतभेदांसह प्रत्येक अँगलने तपास केला जात आहे. यासोबत, सुशांत आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कटकारस्थानाचा खुलासा झालेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याचा तपशील समोर आणला जाईल.

रिया चक्रवर्तीने अमित शहांना लिहिले होते पत्र

सुशांत सिंह राजपूत सुसाइड केसमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्यांमध्ये आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नावही जोडले गेले आहे. रियाने यासंदर्भात ट्विट केले आहे. गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात दखल देण्याची मागणी केली आहे. ट्विटमध्ये तिने स्वतःला स्पष्टपणे सुशांतची गर्लफ्रेंड असे संबोधले आहे. 

रियाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- आदरणीय अमित शाह सर. मी सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. त्याच्या अकस्मात निधनाला एक महिना उलटून गेला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. न्यायाच्या हितासाठी मी हात जोडून या प्रकरणात सीबीआय चौकशीची विनंती करते. मला फक्त हे समजून घ्यायचे आहे की सुशांतवर असा काय दबाव होता ज्यामुळे सुशांतने हे पाऊल उचलले.