आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदित खेळाडू - मोहसिन खान:मुंबईकडून नाही मिळाली संधी; यंदा लखनऊसोबत करारबद्ध, घेतले 8  बळी

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहसिन खान यंदाची आयपीएल गाजवत आहे. त्याने (४/१६) दिल्लीविरुद्ध धारदार गोलंदाजी करताना लखनऊ संघाला विजय मिळवून दिला. त्याने वाॅर्नर, ऋषभ पंत आणि पाॅवेलला बाद करण्याचा पराक्रम गाजवला. यासह ताे सामनावीरचा मानकरी ठरला. त्याला तीन वर्षांपर्यंत मुंबईने आपल्यासोबत करारबद्ध केले होते. मात्र, त्याला संधी दिली नाही. यंदा लखनऊने २० लाखांत करारबद्ध करून संधी दिली. त्याने ८ बळी घेतले आहेत.

देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीमुळे मोहसिनने आयपीएलमध्ये मुंबई संघाचे लक्ष वेधून घेतले. यातून मुंबईने त्याला २०१८ मध्ये करारबद्ध केले. ताे २०२० पर्यंत संघासोबत होता. यादरम्यान त्याला संधी मिळाली नाही. मात्र, त्याने यादरम्यान जहीर खानच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गोलंदाजीचा दर्जा उंचावला. याचा निश्चित असा मोठा फायदा त्याला यंदाच्या सत्रात होत आहे. यंदा त्याला लखनऊ संघाकडून मोठी संधी मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...