आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य नको; राज ठाकरेंची तंबी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने जे प्रवक्ते नेमलेले आहेत तेच याबाबत बोलतील. इतर कुणीही बोलण्याचा शहाणपणा करू नये, अशी तंबी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांना रविवारी (ता.८) दिली आहे.

राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र, राज यांच्या दौऱ्याला अयोध्येतील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. मनसेच्या गुंडांनी उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण केली होती. ते आम्ही अजून विसरलेलो नाही. त्यामुळे राज यांनी अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी बृजभूषण यांची आहे. राज यांना इशारा दिल्याने सिंह मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शिवाय गेली दोन दिवस ते मराठी वृत्तवाहिन्यांवरही येऊन राज ठाकरे यांना आव्हान देत आहेत. नुकतेच मनसेचे काही नेते बृजभूषण सिंह यांच्यासोबत वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी झाले होते. त्यामुळे मनसेची उलटसुलट भूमिका जात आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...