आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा उपाध्यक्षांवरच ठपका:अविश्वास प्रस्तावामुळे उपाध्यक्षांना अपात्र ठरवण्याचे अधिकार नाही - आमदारांचे विधिमंडळ सचिवांना पत्र

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेचे अधिकारच नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी केली असून याबाबत त्यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिले आहे.

उपाध्यक्षांच्या पदाविषयी वाद

विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी हे पत्र दिले आहे. त्यात नमुद आहे की, बंडखोर आमदारांनी नरहरी झिरवळ यांना हटवण्याची मागणी केली आहे. बालदी आणि अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, उपाध्यक्षांच्या पदाविषयी वाद असताना त्यांनी निलंबनाबाबत कोणताही निर्णय त्यांनी घेऊ नये अशी त्यांची मागणी आहे.

कोर्टाचा दाखला दिला

2016 च्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या खटल्याविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अहवाल उभयंतानी दिला. विधान मंडळाच्या सचिवांना हे पत्र देण्यात आले आहे. विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवळ यांना हटविण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नाहीत. 2016 च्या सर्वोच्च न्यायालयाचा दिला पत्रात दाखला घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईपर्यंत त्यांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत.

भाजपकडून अविश्वास प्रस्ताव

नरहरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपने दोन दिवांपूर्वीच दाखल केला. त्यामुळे कोणत्याही आमदारांचे निलंबन ते करू शकत नाही. या तारखेनंतर कितीही प्रस्ताव दाखल झाले तरी आधी अविश्वास प्रस्तावावर निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतरच आमदारांचे निलंबनावर निर्णय घेता येईल असेही भाजप समर्थक या आमदारांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...