आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्ट भूमिका:रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात नको : ठाकरे

रत्नागिरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणासारख्या उत्तम जागी येऊ नयेत. पण महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता प्रकल्प राज्याबाहेर​ जाणे हे देखील योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथे त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.राज म्हणाले, लपून छपून भुरटे जमीन खरेदी करायला येतात वेळीच खबरदारी घेतली, तर नुकसान टळते. बाहेरची माणसे पट्टेच्या पट्टे खरेदी करतात, तेव्हा लोकांना काहीच संशय येत नाही. हजारो एकर जमीन हातातून निघून जाते आपल्याला कळत नाही की, या जमिनी कशासाठी खरेदी होते. यावर संशयही लोक घेत नाही.

आम्हाला कोकणात संधी : कोकणात मनसेसाठी सकारात्मक वातावरण आहे. कोकणातील पक्ष संघटना आगामी काळात मजबूत आणखी होईल. जानेवारीत कोकणात २ सभा घेणार असून एक सभा कुडाळ आणि दुसरी सभा चिपळूण किंवा रत्नागिरी येथे आयोजित केली जाणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...