आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्ण वाढत असले तरी सध्या राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाही. लॉकडाऊनबाबात अद्याप चर्चा झालेली नाही. यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार नाही. मात्र, उपाययोजना म्हणून निर्बंध वाढवणार येणार आहे. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी सांगितले.
शुक्रवारी 8067 कोरोना रुग्णांची नोंद
दरम्यान, शुक्रवारी ओमायक्रॉन बाधितांची संख्या 454 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी 8067 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्णांची संख्या मुंबईत आढळून आली आहे. मुंबईत 5428 रुग्ण आढळून आले आहेत.
अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांना कोरोनाची लागण
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना 5 दिवसांत 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाली. तसेच कालच राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या काळात 10 मंत्र्यांना आणि 20 पेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहीजे, असे अजित पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.