आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • No Kissing Zone In Mumbai| Borivali Society Had To Put No Kissing Zone Sign After It Became Kissing Spot For Couples Near By News And Updates

मुंबईत नो किसिंग झोन:कपल्सच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून मुंबईतील एका कॉलनीत स्थानिकांना लावावे लागले 'नो किसिंग झोन' चे फलक! लॉकडाउनमध्ये वाढली होती प्रकरणे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोळे बंद करून करावी लागायची एंट्री, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप

मुंबईतील एका सोसायटीमध्ये पेन्ट करण्यात आलेले फलक सध्या चर्चेत आहे. या ठिकाणी एका सोसायटीतील लोकांनी आपल्या पार्किंगच्या जागी 'NO KISSING ZONE' (नो किसिंग झोन) असे ठळक अक्षरांमध्ये पेन्ट केले आहे. स्थानिकांच्या मते, या ठिकाणी येणाऱ्या रोजच्या प्रेमी युगुलांमुळे ते कंटाळले होते. लॉकडाउनच्या काळापासूनच या ठिकाणी कपल्स येण्यास सुरुवात झाली होती. त्यांना थांबवण्यासाठी सोसायटीने हा प्रयत्न केला आहे.

सोसायटीतील नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे, लॉकडाउनच्या काळात या सोसायटीच्या पार्किंगच्या जागेवर कपल येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी लावलेल्या वाहनांच्या आड कपल्स अश्लील चाळे करतात. गेल्या काही दिवसांपासून हा जनु हा कपल्सचा स्पॉट बनत होता. अशात जोडप्यांच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून आम्ही हा फलक लावला असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

फलक लिहिल्यापासून कमी झाले प्रमाण
मुंबईतील बोरिवली येथे असलेल्या सत्यम शिवम सुंदरम सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. सोसायटीत राहणाऱ्यांनी सांगितले, की लोक या ठिकाणी येऊन खुलेआम किस करायचे. स्थानिकांना आपल्या कुटुंबासोबत सोसायटीत ये-जा करणे कठिण झाले होते. अगदी डोळे बंद करून लोकांना आपल्या घरात प्रवेश करावा लागत होता. त्यानंतर याच ठिकाणी 'NO KISSING ZONE' असे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. असे लिहिल्यानंतर जोडपे येण्याचे प्रमाण खूप कमी झाले असे स्थानिकांनी सांगितले.

पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप
सोसायटीतील सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे, या ठिकाणी येता-जाता कपल्स किस करताना दिसून येत होते. तक्रारी वाढल्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून ते नगरसेवक आणि पोलिसांना पाठवले. पण, काहीच कारवाई झाली नाही. पोलिसांनी कारवाई केली नाही त्यामुळे देखील आम्हाला स्वतःच बोर्ड लावावा लागला आहे. सोसायटीचे चेअरमन आणि वकील विनय अनसुरकर सांगतात, की आम्ही कपल्सच्या विरोधात नाही, तर त्यांच्याकडून होणाऱ्या अश्लील चाळ्यांच्या विरोधात आहोत. सोसायटीमध्ये लहान-मोठे सगळेच लोक राहतात. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता एक गुन्हा आहे, तरीही पोलिस कारवाई करत नव्हते. त्यामुळे आम्हालाच बोर्ड लावावा लागला.

बातम्या आणखी आहेत...