आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशी परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे विधानसभेत सिद्ध होत असते. जेव्हा विधानसभेत फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा हे सरकार बहुमतात असेल, असा मला विश्वास वाटतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
ते म्हणाले, सेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावे लागेल. इथे आल्यावर त्यांना आसाम व गुजरातचे नेते मार्गदर्शन करतील, असे वाटत नाही. या आमदारांनी घेतलेला निर्णय हा पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघातही याची प्रतिक्रिया उमटेल. त्यामुळेच लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत.
केसालाही धक्का लावाल तर... : राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट केले, ‘शरद पवार साहेब आमदारांना ‘सभागृहात येऊन दाखवा,’ अशा धमक्या देत आहेत. ते येणारच आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करतील. त्यांच्या केसालाही धक्का लावाल तर घर गाठणे कठीण होईल.
बंडखोर आमदारांनी इथे यावे
माध्यमांमधून ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण जे आमदार महाराष्ट्राबाहेर गेले, ते राज्यात परतल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना नेले ही वस्तु:स्थिती लोकांना सांगतील व ते पुन्हा शिवसेनेसोबत राहतील. त्यानंतर बहुमत कुणाचे आहे, ते सिद्ध होईल. बंडखोर आमदारांनी इथे येऊन बोलले पाहिजे, आसाममध्ये राहून नाही, असे खडे बोलही शरद पवार यांनी सुनावले.
काका-पुतण्यात मतभिन्नता
शिंदे यांच्या बंडाला भाजपची फूस असेल, असे वाटत नसल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्याच्या काही तासांतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रपरिषद घेत अजितदादांना बाहेरची माहिती नाही, अशी कानउघाडणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.