आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • No One Has Been Insulted By The Governor. Nitesh Rane's Question Said How Many Marathi Children Have Been Made Rich By Those Who Opposed The Governor

राज्यपालांकडून कुणाचाही अवमान नाही:नितेश राणेंचा दावा; म्हणाले - राज्यपालांना विरोध करणाऱ्यांनी किती मराठी मुलांना श्रीमंत केले?

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपालांवर सर्व राजकीय पक्षांमधून टीका होत असताना नितेश राणेंनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. आमदार नितेश राणे म्हणाले की, राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी, किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना बीएमसीचे कामे दिले? तेव्हा तर तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात असे राणेंनी म्हटले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिंदे गटातही राज्यपालांच्या वक्तव्यानंतर नाराजी दिसून आली आहे. दीपक केसरकरांनी तर केंद्र सरकारने राज्यपालांना असे बोलू नये यासाठी सूचना कराव्या अशी मागणीही केली आहे. तर यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत राज्यपाल कोश्यारी यांची पाठराखण केली आहे.

पक्षप्रमुखांची संपत्ती चतुर्वेदींकडे का?

एवढेच कशाला.. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ? असा प्रश्न आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. भाजपकडून कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आता राणेंच्या ट्विटनंतर भाजपविरुद्ध इतर पक्ष असे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...