आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहार पोलिसांनी आपल्या तपासात नवा खुलासा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जात होते की, सुशांतने अनेक सिम कार्ड बदलले होते. मात्र ताज्या जबाबानुसार सुशांत ज्या सिम कार्डचा वापर करत होता. त्यामधील कोणताही त्याच्या नावावर नव्हता. त्यामधील एक त्याचा मित्र सिद्धा पिठानीच्या नावावर घेतलेला होता. आता बिहार पोलीस कॉल डिटेल रिकॉर्ड्स (सीडीआर) तपासत आहे.
दिशा सलियनच्या घरी पोहोचली टीम
न्यूय एजंसी एएनआयनुसार बिहार पोलिसांनी म्हटले की, ते आता सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सलियनच्या कुटुंबाशीही विचारपूस करणार आहेत. बिहार पोलिसांची टीम फोनव त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करुनही यशस्वी झाली नव्हती. यामुळे ते आता दिशाच्या घरी चौकशीसाठी जात आहे.
पब्लिसिटीसाठी विचारपूस करत होते मुंबई पोलिस - आरके सिंह
याच काळात केंद्रीय मंत्री आरके सिंह यांनीही म्हटले की, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हे सीबीआयकडे देण्यात यावे याची मागणी करत आहेत. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांजवळ गेलो होतो. मात्र ते यासाठी तयार नाहीत. न्याया मिळावा या हेतून सीबीआय चाचणी योग्य आहे. सुशांतच्या कुटुंबालाही हेच हवे आहे. ते पुढे म्हणाले की, मुंबई पोलिसांनी अजुनही केसमध्ये काहीच केलेले नाही. ते केवळ पब्लिसिटी लोकांना विचारपूस करत होते. त्यांनी एकही एफआयआर दाखल केलेला नाही आणि कोणावर संशय आहे किंवा ते कोणाची चौकशी करत आहेत याविषयीही माहिती दिलेली नाही. आता या प्रकरणात एक एफआयआर पटनामध्येही दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.