आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीच्या शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी मागितले कर्ज:शेती करून पैसे मिळत नाहीत, भाड्याने हेलिकॉप्टर चालवून कमावणार नफा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर, गाडी, टॅक्सी चालवण्यासाठी कर्ज घेण्याचा अनेकांचा कल असतो पण चक्क हेलिकाॅप्टरसाठी कर्ज घेण्याचा कुणी विचार केला तर..? विचारात काय पडता..हेलिकाॅप्टर खरेदी करायचे असल्याने कर्जासाठी हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क बॅंकेत धाव घेत अर्जही केला आहे. या शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी 6.6 कोटी रुपयांचे कर्ज मागितल्याने अर्जामुळे बॅंकेचे अधिकारीही अव्वाक झाले.

शेती घाट्यात म्हणून हा पर्याय

शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, शेती हा आता फायदेशीर व्यवहार राहिलेला नाही, म्हणूनच त्यांना हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे आणि ते भाड्याने चालवायचे आहे. शेतकऱ्याने बँकेत कर्जासाठी अर्ज केला आहे.

शेतीत नफा नाही

ताकतोडा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास पतंगे यांनी गुरुवारी चक्क हेलिकॉप्टर खरेदीसाठी स्टेट बँकेच्या गोरेगाव (ता. सेनगाव) शाखा व्यवस्थापकांकडे गुरुवारी (ता. 16) पत्र दिले आहे. गोरेगाव येथील बँकेत धाव घेत. त्यांनी हेलिकॉप्टरसाठी कर्जासाठी अर्ज केला. या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे 2 एकर जमीन आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना शेतीमध्ये कोणताही लाभ मिळत नाही. अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा परिस्थितीमुळे त्यांची कमाई कमी झाली आहे.

अवकाळी पावसाचा फटका बसला

शेतकरी कैलास पतंगे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत सोयाबीनची लागवड केली, मात्र अवकाळी पावसामुळे मला फटका बसला आणि सोयाबीनद्वारे चांगले उत्पन्न मिळाले नाही.

हेलिकॉप्टरद्वारे नफा कमवायचाय

केवळ श्रीमंत माणसानेच मोठी स्वप्ने पाहावी असे नाही, तर शेतकऱ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की इतर अनेक व्यवसाय आहेत, जे ते करू शकतात, परंतु सर्वांमध्ये स्पर्धा आहे. चांगला नफा मिळावा म्हणून हेलिकॉप्टर खरेदी करून ते भाड्याने चालवायचे असल्याचेही पतंगे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...