आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची पदवी प्रकरण:मोदींची पदवी नव्हे, बेरोजगारी अन् महागाई महत्त्वाचे मुद्दे , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात बेरोजगारी, महागाई आणि कायदा-सुव्यवस्थेसारखे मोठे मुद्दे असताना एखाद्याची शैक्षणिक पदवी हा राजकीय मुद्दा कसा होऊ शकतो, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. पवार म्हणाले, आज धर्म आणि जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. अशा वेळी पदवीसारखे मुद्दे उपस्थित करणे अनावश्यक ठरते. उल्लेखनीय म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची शैक्षणिक पदवी सार्वजनिक करण्याचा मुद्दा लावून धरत आहेत.

हे मुद्देही अनावश्यक आहेत : पवार
हिंडेनबर्ग प्रकरण
: अदानींवरील हिंडेनबर्ग अहवालावरून काँग्रेससह इतर पक्षांकडून जेपीसी स्थापण्याची मागणी अनावश्यक असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.
सावरकर : राहुल गांधींनी सावरकरांचा मुद्दा लावून धरल्याबद्दल शरद पवार म्हणाले होते, हे प्रासंगिक नाही. सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले आहे.