आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाॅडेल उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्याला उर्फीनेही प्रत्युत्तर दिल्यामुळे दोघींमधील वाद वाढला. त्यातच वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही या वादात ओढले. त्यावरून आयोगाने वाघ यांना नोटीस बजावली. एकूणच उर्फीच्या वादातून एकेकाळच्या दोन मैत्रिणींत तेढ निर्माण झाली.
‘स्त्रियांचा सन्मान जपणे महिला आयोगाचे काम. पण ते दुटप्पी वागत आहे. अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टर्सवरून गदारोळ झाला तेव्हा आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडित व दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली. या सिरीजमुळे धूम्रपान व अंगप्रदर्शनाचा चुकीचा संदेश जात असल्याचे म्हटले होते. आता मात्र उर्फीवर कारवाई करण्याएेवजी आयोग ‘कुणी काय कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न’ असे म्हणतेय. उघड्या फिरणाऱ्या महिलांना आयोग जाब विचारत नाही. उर्फीसोबत आयोगही बेफाम झालाय का?’ अशी टीका वाघ यांनी चाकणकर यांच्यावर केली. पण वाघ यांनी खोटी वक्तव्ये करून आयोगाचा अवमान केलाय. त्यांच्या बोलण्यातून दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते,’ असे म्हणत चाकणकर यांनी वाघ यांना नोटीस बजावत दोन दिवसांत खुलासा मागितला आहे.
चित्रा वाघ यांनी दिले चोख प्रत्युत्तर
तेजस्विनीला नोटीस नाही, चित्रा वाघ प्रसिद्धीसाठी खोटे बोलतात
आयोगाने तेजस्विनी पंडितला कधीच नोटीस दिली नव्हती. फक्त संजय जाधवांना पाठवली होती. पण चित्रा वाघ आकसापोटी व प्रसिद्धीसाठी खोटी माहिती देऊन महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत.
रूपाली चाकणकर, अध्यक्षा महिला आयोग
अशा ५६ नोटिसा आल्यात, अस्मितेची लढाई सुरू राहील
जी नंगानाच करत फिरतेय तिला सोडून मला नोटीस! असो. ५६ नोटिसांत अजून एक भर. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची माझी लढाई अशीच सुरूच राहील.
- चित्रा वाघ, भाजप महिला अध्यक्षा
शेवटी हातकड्यांमध्ये... उर्फी
चित्रा वाघ यांना उर्फीने वेळोवेळी सोशल मीडियातून उत्तर दिले. तोकडे कपडे घातलेले फोटो शेअर करत ती रोजच टीकाकारांना खिजवत आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर आपलाच हातकडी घातलेला फोटो शेअर करत ती म्हणते ‘तुम्हाला मला हातकडी घातलेले पाहायचे होते. ती इच्छा मंजूर केलीय.’
आधी सख्ख्या मैत्रिणी, नंतर शूर्पणखाची दिली उपमा {चित्रा वाघ व रूपाली चाकणकर पूर्वी राष्ट्रवादीत होत्या. वाघ महिला आयोगाच्या सदस्यही होत्या. पण २०१९ मध्ये त्या भाजपत गेल्या. नंतर राष्ट्रवादीने रूपाली यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले. एकेकाळी मैत्रिणी असलेल्या या दोघी आता राजकारणात एकमेकींना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. { जुलै २०२० मध्ये रूपाली यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुबीत अॅडमिट केले होते. तेव्हा ‘माझी मैत्रीण, जुनी सहकारी लवकरात बरी व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना’ असे ट्वीट चित्रा यांनी केले होते. { २०२१ मध्ये मविआने रूपाली यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले. तेव्हा ‘रावणाला मदत करणारी शूर्पणखा या पदावर बसवू नका,’ असे ट्वीट चित्रा यांनी केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.