आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या दौऱ्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ:आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही अयोध्येला जाणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलेले असतानाच अयोध्या दौऱ्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौरा करणार असून त्यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेदेखील अयोध्या दौऱ्याची रणनीती आखत आहेत. राजकीय नेत्यांच्या या अयोध्या दौऱ्यात आता आणखी एक भर पडली असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अयोध्यातील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारी या दौऱ्याच्या निमित्ताने महंत बृजमोहन दास यांनी मुंबईतील टिळक भवन येथे नाना पटोले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बृजमोहन दास यांनी पटोले यांना अयोध्या दौऱ्याचे आमंत्रण दिले असून हे आमंत्रण नाना पटोले यांनी स्वीकारले. दरम्यान, पटोले यांनी आपण लवकरच अयोध्येला जाऊ, असे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...