आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राज्यपालांची भेट:आता जाहीरच करतो, मी आरएसएस आणि भाजपसोबत आहे! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेकडून करण्यात आली होती मारहाण

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेकडून मारहाण करण्यात आलेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता जाहीरच करतो, मी आरएसएस आणि भाजपसोबत आहे असे ते म्हणाले आहेत.

मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मीडियाशी बोलताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, 'आत्तापासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे. मला जेव्हा मारहाण करण्यात आली तेव्हा शिवसेनेने माझ्यावर मी भाजप-आरएसएससोबत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता मी घोषणा करतो की आजपासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे.' असे मदन शर्मा म्हणाले आहेत.

या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयीही निवृत्त नेव्ही ऑफिसर मदन शर्मा यांनी सांगितले आहे. राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी माफी मागायला हवी असंही ते म्हणाले.