आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यावधी होईल की नाही याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिंमत करणार नाहीत. कारण लोकांमध्ये राज्य सरकारबद्दल एवढी नाराजी आहे की, राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी सरकार कोसळेल. अर्थात आघाडी पुन्हा सत्तेवर येणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केला.
लोकांमध्ये महाविकास आघाडी सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या तर त्याचा फटका आपल्यालाच बसेल याची जाणीव आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे ते निवडणुका घेणार नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली. सहकार चळवळीमध्ये चुकीची कामे केलेल्यांना आणि सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. अमित शहा यांंच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे, असे ते म्हणाले. तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांचे बॉस छगन भुजबळ यांच्यासोबत या विषयावर अकॅडमिक मुद्द्यांवर चर्चा करायला मी तयार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.