आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोऱ्या रंगाची इच्छा कधी संपणार नाही, ही म्हण आता जुनी झाली. आजच्या जमान्यात ‘ब्राऊन इज ब्यूटीफुल’ची म्हण रुळत अाहे. पाश्चात्त्य देशातील गोऱ्या महिलादेखील चेहऱ्याचा रंग सावळा करण्यासाठी मेकअपचा आधार घेत आहेत. जगभरात ब्राउन स्किन टोनच्या मेकअपच्या वाढत्या मागणीचा फायदा भारतीय मेकअप आर्टिस्ट घेत आहेत. स्वस्त इंटरनेट डेटामुळे त्यांना यात मदत मिळत आहे. भारतीय आर्टिस्ट सोशल मीडिया चॅनल्सवर मेकअपविषयी आपले कौशल्याचे लाइव्ह प्रदर्शन करतात. हे कंटेंट क्रिएट करुन चॅनलवर अपलोडदेखील करतात. ब्यूटी अँड लाइफस्टाइल इन्फ्लुएन्सर्स म्हणवले जाणाऱ्या या आर्टिस्टच्या चाहत्यांची संख्या आणि कमाई लाखात आहे. उदा-३४ वर्षांची देबाश्री बॅनर्जी फुल टाइम ब्यूटी आणि लाइफस्टाइल इन्फ्लुएन्सर आहे. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्सना मेकअप आणि ब्युटी टिप्स देते.
देबाश्री म्हणते, तिचे बरेच फॉलोअर्स भारताच्या बाहेरचे आहेत. मिडल ईस्ट, पूर्व आशियाई देशांव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपातदेखील तिचे फॉलोअर्स आहेत. मुंबईतील आणखी एक ब्यूटी टिप्स देणारी फॅबी म्हणते, लोकांना वाटते की, ब्राऊन स्किन सुंदर नसते.
देशात ब्यूटी-पर्सनल केअर मार्केट १.२२ लाख कोटींचे देशाचा ब्यूटी आणि पर्सनल केअर मार्केट सध्या १.२२ लाख कोटी रुपयांचे आहे. २०३०पर्यंत ते दुप्पट होण्याची शक्यता आहे. याबरोबरच भारतात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मार्केटदेखील वाढून ९८३ कोटींचे झाले आहे. या नव्या प्रोफेशनमुळे देबाश्रीसारख्या आर्टिस्टना रोजगार मिळाला, शिवाय त्यांची कमाईही लाखात झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.